बॉस्पोरस सामुद्रधुनी
बॉस्पोरस सामुद्रधुनी : काळा समुद्र व मार्मारा समुद्र यांस जोडणारी व आशियाई तुर्कस्तानास यूरोपीय तुर्कस्तानापासून विभक्त करणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीची लांबी ३० किमी., कमाल व किमान रुंदी अनुक्रमे ३.७ किमी. व ०.७५ किमी., तर खोली ३६.६ मी. ते १२४.४ मी. आहे.